फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मौजे राजुरी येथील पोलीस पाटलाने गावातील एका अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली. याप्
फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मौजे राजुरी येथील पोलीस पाटलाने गावातील एका अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस पाटलाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मौजे राजुरी, ता. फलटण गावचे हद्दीत पोपट गायकवाड यांचे शेताजवळ अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव (रा. राजुरी, ता. फलटण) हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला थांबवून तुझ्या संगे बोलायचे आहे असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. नंतर पोलीस पाटील बागाव यांने रात्री 12:00 वाजण्याच्या सुमारास मुलीस घराचे बाहेर बोलवून त्याने पुन्हा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तू जर कोणास काही सांगितले तर तुझ्या घरातील लोकांना जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. भितीने घडलेल्या प्रकाराबाबत या मुलीने कोणास काही सांगितले नाही. मुलगी घरात गप्प बसत असल्याने आई, वडिलांनी विश्वासात घेवून विचारल्यानंतर अल्पवयीन मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यावर आज रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन मुलीने पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव याच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस पाटील बागाव याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.
COMMENTS