Homeताज्या बातम्यामनोरंजन

रजनीकांतला जेलरच्या नफ्यातून मिळाले 100 कोटी

देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता बनले

चेन्नई/वृत्तसंस्था ःआजही आपल्या अभिनयाची जादू पेे्रक्षकांवर कायम ठेवणारा अभिनेता म्हणून रजनीकांत यांना ओळखले जाते. रजनीकांतचा नुकताच रिलीज झालेला

 सप्तशृंगी  मातेच्या दर्शनासाठी मास्क बंधनकारक 
काळा बाजार करणार्‍यांच्या नातेवाइकांकडून घेतलेली पार्टी अंगलट
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा

चेन्नई/वृत्तसंस्था ःआजही आपल्या अभिनयाची जादू पेे्रक्षकांवर कायम ठेवणारा अभिनेता म्हणून रजनीकांत यांना ओळखले जाते. रजनीकांतचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ’जेलर’ने चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. चित्रपटाने देशात 381 कोटी रुपये कमावले आहेत. तर जागतिक स्तरावर चित्रपट 600 कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासोबतच रजनीकांतला जेलरच्या नफ्यातून 100 कोटी रूपये मिळाले आहेत.
अलिकडेच चित्रपटाचे निर्माते कलानिधी मारन यांनी रजनी यांची भेट घेतली आणि त्यांना चित्रपटाच्या नफ्यातील हिश्शाचा चेक सुपूर्द केला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चेक 100 कोटींचा आहे. त्याचवेळी, निर्मात्यांना या चित्रपटातून आतापर्यंत एकूण 210 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सन पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या मिटींगचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये कलानिधी, रजनी यांना चेक सुपूर्द करताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, साऊथचे चित्रपट व्यवसाय अभ्यासक मनोबाला विजयबालन यांनी हाच फोटो शेअर करत लिहिले, ’जेलरच्या निर्मात्यांनी रजनिकांतला 100 कोटींचा धनादेश दिल्याची बातमी मिळाली आहे. हा जेलरचा प्रॉफिट शेअरिंग चेक आहे. यासोबतच रजनी देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते बनले आहेत.

COMMENTS