Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुका क्रीडा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र शिरसाट

पाथर्डी ः पाथर्डी तालुका क्रीडा शिक्षक समितीचे अध्यक्षपदी राजेंद्र उर्फ पप्पू शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे. शेवगाव येथील त्रिमुर्ती क्रिडा स

आधी तक्रार करूनही निर्णय घेतला नाही : जाधव यांच्या वकिलांचा युक्तिवाद
कोपरगाव शहरात हप्ता वसुलीतून हाणामारी ? कोपरगावात गुन्हा
डॉ आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे – अँड.नितीन पोळ

पाथर्डी ः पाथर्डी तालुका क्रीडा शिक्षक समितीचे अध्यक्षपदी राजेंद्र उर्फ पप्पू शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे. शेवगाव येथील त्रिमुर्ती क्रिडा संकुल येथे जिल्हा क्रिडा विभाग व पाथर्डी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक पार पडली.यामध्ये पाथर्डी तालुक्याच्या क्रिडा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा एम.एम. निहाळी विद्यालयाचे क्रिडा शिक्षक पप्पु शिरसाट यांची बिनविरोध निवड करून क्रीडा समिती स्थापन करण्यात आली.
या पाथर्डी तालुका क्रीडा समितीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र उर्फ पप्पू शिरसाट, उपाध्यक्ष अविनाश घुगे, सचिव अजय शिरसाट, सह सचिव एकनाथ पालवे यांची निवड करण्यात आली.तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी या समितीचे योगदान उज्वल ठरणार आहे. निवडीनंतर पप्पु शिरसाट म्हणाले, मागील तीन वर्षात ग्रामीण भागात खेळाचा प्रसार व्हावा म्हणुन अनेक स्पर्धेचे आयोजन केले. या विविध स्पर्धांमुळे तालुक्यातील अनेक खेळाडु राज्य स्तरापर्यंत सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केली. यापुढे सुध्दा खेळाडुंना प्रोत्साहन देऊन अतिउच्च कामगिरी तालुक्याच्या खेळाडू कडून होण्यासाठी तालुका क्रीडा समिती सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू. पाथर्डी तालुक्याचे नाव देश पातळीवर क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घेऊन जाण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न असतील. शिरसाट हे स्वतः कुस्तीतील राष्ट्रीय खेळाडु आहेत.या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, महेंद्र शिरसाट, प्राचार्य बबन चौरे, प्रा. संजय घिगे, प्रा. अशोक दौंड, प्रा. सुरेश मिसाळ, प्रा. कल्पजीत डोईफोडे यांनी अभिनंदन केले.

COMMENTS