Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजेंद्र शिंगणे हाती घेणार तुतारी ?

खा. शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा

पुणे: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून, या पक्षातून त्या पक्षात जाणार्‍यांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. भाजपचे नेते हर्षवर

करू साजरे सण हरवून कोरोनाला
Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | LokNews24
अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
येत्या तीन-चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार: राजेंद्र शिंगणे -  Marathi News | Maharashtra will face remdesivir shortage in 2 3 days says rajendra  shingane | TV9 Marathi

पुणे: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून, या पक्षातून त्या पक्षात जाणार्‍यांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी खासदार शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच हाती तुतारी घेणार असल्याचे दिसून येत आहे.
शिंगणे यांनी नुकतीच खासदार शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. या भेटीसाठी जातांना त्यांनी माध्यमांसमोर फाईलने आपले तोंड लपवत आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. मयाबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत, फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा आता सुरू आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाटेवर असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियात सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणार्‍या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओ मधील स्वतःचा चेहरा फाईलने लपवणारी व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS