राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोलाचा सल्ला. शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे( Raj Thakre

“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 
महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे( Raj Thakre )यांनी ट्वीट करत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मात्र अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे(Eknath Shinde)( यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी शिंदेचं अभिनंदन करताना ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘श्री. एकनाथ शिंदे जी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन! ‘ असे म्हटले आहे. आता राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सावधानतेचा इशारा देत नेमक्या कोणत्या धोक्याचा इशारा दिलाय हे राज ठाकरेंकडून स्पष्ट होईल.

COMMENTS