Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेनबो स्कूल आयोजित वत्कृत्व स्पर्धा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन येथे सुरू असलेल्या लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतीक महोत्सवात रेनबो इंटरनॅशनल

काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा – स्नेहलता कोल्हे
विकासकामांच्या जोरावर डॉ. सुजय विखे बाजी मारतील ः वसंत लोढा
रॅगिंग ही एक प्रकारची विकृतीच ः न्यायाधीश अलमले

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन येथे सुरू असलेल्या लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतीक महोत्सवात रेनबो इंटरनॅशनल स्कूल प्रायोजित, शालेय विद्यार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील वत्कृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता पाचवी ते नववीतील एकुण 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संचालक व कोपरगाव कॉग्रस अध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून झाली. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणुन लायन्स क्लबचे सत्येन मुंदडा, राम थोरे, आप्पासाहेब शिंदे, सुरेश शिंदे, बाळासाहेब जोरी, प्रसाद भास्कर, सुमित सिनगर उपस्थित होते. या स्पर्धचे प्रायोजक रेनबो इंटरनॅशल स्कूल यांच्या वतीने प्रथम विजेत्यास बक्षीस 1000 रू द्वितीय बक्षीस 700 रु तृतीय बक्षीस 500 रु जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांगितले. या स्पर्धेतुन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा जिवन प्रवास विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे विद्यार्थांनी महाराजांचे विचार आत्मसात करून आपले जिवन उज्जवल करावे असा संदेश आकाश नागरे यांनी दिला. सुत्रसंचालन प्रसाद भास्कर यांनी केले व आभार राम थोरे यांनी मानले.

COMMENTS