कोपरगाव तालुका ः शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षा 2023-24 मध्ये उत
कोपरगाव तालुका ः शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षा 2023-24 मध्ये उत्कृष्ट निकाल मिळवला आहे. एकूण 32 विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये 100 टक्के निकाल प्राप्त झाला आहे. प्रथम स्थानावर भक्ती अमर कवडे 97.2 टक्के गुणांसह, गणित विषयात 100 पैकी 100 व इंग्रजी आणि सामाजिक अभ्यासात 98 व 100 गुण प्राप्त केले आहे. त्यासोबतच अभिनय धीरज बाजाज (94.4 टक्के), दिव्या पुष्पेंद्र शर्मा (93.8 टक्के), हर्षदा सचिन शिंदे (92 टक्के), साक्षी अनंत वाणी (90.8 टक्के) आणि समिधा दिपक औताडे (90.4 टक्के) यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना मेरीट, डिस्टिंक्शन व फर्स्ट क्लास गुण प्राप्त झाले. मागीलवर्षी देखील 53 पैकी 21 विद्यार्थी 90 टक्केच्या पुढे राहून रेनबो स्कूलचा निकाल अहमदनगर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ ठरला होता. आजचा हा अद्वितीय निकाल रेनबो इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उत्कृष्ट परिश्रमाचा प्रतिफळ आहे. या निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष कांतिल अग्रवाल, सचिव संजय नागरे, विश्वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे, चांगदेव कातकडे, अर्जुन काळे, कार्यकारी संचालक व प्राचार्य आकाश नागरे, शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, सर्व शिक्षक आदी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
COMMENTS