Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात पावसाच्या सरी

पावसामुळे वातावरणात गारवा

कोपरगाव शहर ः गेल्या दोन महिन्यापासून उष्णतेने मनुष्यासह संपूर्ण जीवसृष्टी पुरती हैराण झाली असताना दोन दिवसापासून राज्यातील बहुतांश भागासह कोपरगा

ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात संपन्न
मनसे संचलित लताई कोविड सेंटर आज पासून बंद ! l LokNews24
श्रीकृष्ण जीवनचरित्र सृष्टांची बाजू सांगणारे चिरंजीवचरित्र

कोपरगाव शहर ः गेल्या दोन महिन्यापासून उष्णतेने मनुष्यासह संपूर्ण जीवसृष्टी पुरती हैराण झाली असताना दोन दिवसापासून राज्यातील बहुतांश भागासह कोपरगाव तालुक्यात सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काही थंडावा जाणवत आहे. मागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाण्याचा मोठा दुष्काळ असून यासोबतच सूर्य देखील मोठ्या प्रमाणात आग ओकत असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या झळा मनुष्यासह संपूर्ण जीवसृष्टीला जाणवत असल्याने अनेक भागात या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली आहे. परंतु या उकाड्यापासून काहीसा दिलासा का होईना म्हणून गुरुवार दि 9 मे व शुक्रवार दि 10 मे रोजी राज्यासह कोपरगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाच्या मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा पसरला आहे. परंतु या अचानक आलेल्या पावसाने शेतकरी बांधवांनी चाळीत अथवा उघड्यावर साठवून ठेवलेला कांदा व इतर ध्यान झाकण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी धावपळ करावी लागली होती.

राजकीय तोफांनी वातावरण गरमच – या हलक्या सरीने बहुतांश भागात काहीसे वातावरण जरी थंड झाले असले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपाच्या तोफांनी वातावरण अजूनही गरमच आहे.

COMMENTS