Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव नगरपालिकेत समस्यांचा पाऊस

नागरिकांची केवळ आश्‍वासनावरच बोळवण

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासक यांच्या पुढे समस्यांचा पाऊस पाडला मात्र समस्या सुटण्याऐवजी पदरात फक

नगर शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफी द्यावी : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी
फडणवीसांचा हल्लाबोल महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासक यांच्या पुढे समस्यांचा पाऊस पाडला मात्र समस्या सुटण्याऐवजी पदरात फक्त आश्‍वासन पडत आहे.    
कोपरगाव शहरासह महाराष्ट्रातील अनेक नगर पालिका विसर्जित होऊन एक ते दीड वर्षे होऊन गेले त्यामुळे नगर पालिकेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या कडे आहे. नगर पालिका अस्तित्वात असताना नागरिक आपल्या नागरी समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून स्थानिक नगर सेवक यांच्या कडे तक्रार करायचे आणि कमी अधिक प्रमाणात या समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील होत होता मात्र आता नगर पालिकेवर प्रशासक राज असल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट नगर पालिकेत जाऊन मांडाव्या लागत असून प्रत्येक वेळी संबंधित अधिकारी भेटातीलच असेही नाही आणि मांडलेल्या समस्या सुटतील याची कोणतीही खात्री नाही त्यामुळे अर्ज,विनंत्या निवेदन देऊन समस्या सुटल्या नाही तर नागरिकांना शेवटी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असून आंदोलन केल्या नंतर देखील नगर पालिकेने लेखी आश्‍वासन देऊनही काम होईल याची कोणतीही खात्री उरली नाही दिलेल्या लेखी आश्‍वासना नंतर देखील त्या समस्यांचा कोपरगाव येथील नागरिकांना पाठपुरावा करावा लागत आहे. कोपरगाव येथील विविध पक्ष, संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने नगर पालिकेकडे अनेक समस्या मांडल्या वेळ प्रसंगी नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलने केली मात्र समस्या काही सुटल्या नाहीत म्हणून शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष गंगवाल, लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश धुमाळ,भूमी पुत्र फाउंडेशन चे  निसार शेख, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस यांनी कोपरगाव नगर पालिकेचे प्रशासक शांताराम गोसावी यांच्या दालनात ठिय्या मांडून मुख्य चौकातील मुतारी, नगर पालिका वाचनालय इमारती वरील जुने ऐतिहासिक घड्याळ  बसवावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक रस्त्याचे काम तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते गोकुळ नगरी इंदिरा पथ रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी केल्या, त्याच प्रमाणे लोक शाहीर अण्णा भाऊ साठे खुल्या नाट्य गृहाच्या दुरुस्ती काम सुरू करावे आदी मागण्यांचा पाऊस पाडला मात्र नेहमी प्रमाणे पदरात आश्‍वासना शिवाय काही पडत नाही हे लक्षात येताच सर्व जण आक्रमक झाले. मुख्य चौकातील मुतारी बसवली नाही तर भर रस्त्यात पे,अँड युज मुतारी बसवून त्यातून जमा होणारी रक्कम नगर पालिका प्रशासक यांना भेट देण्यात येईल असा पवित्रा घेतल्या नंतर लगेच मुतारी बसवण्याच्या सूचना दिल्या तर नगर पालिका वाचनालय इमारती चे घड्याळ असल्या बाबत काहीच कागद पत्रे नसल्याचे सांगितल्याने थेट गोडावून मध्ये जाऊन घड्याळाचा सांगाडा शोधून काढला तर दोन्ही रस्त्यांच्या तक्रारी बाबत प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेणार असल्याचे तूर्त तरी पुन्हा एकदा आश्‍वासन मिळाले.

COMMENTS