Homeताज्या बातम्यादेश

नव्या संसद भवनाला पावसाची गळती

नवी दिल्ली ः राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरूवार सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, या पावसाचा फटका नव्या संसद भवनाला देखील बसला

पुष्पा चित्रपटामुळेच केला मी हा गुन्हा, मै झुकेगा नही साला
इस्लामपुरात पंतप्रधानांनी साधला नव मतदारांशी ऑनलाईन संवाद
छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा

नवी दिल्ली ः राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरूवार सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, या पावसाचा फटका नव्या संसद भवनाला देखील बसला आहे. तब्बल 800 कोटींपेक्षा अधिक खर्च करून नवी संसद भवनाची इमारत उभारण्यात आली असली तरी, पहिल्याच पावसात या इमारतीला गळती लागल्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला आहे.
राजधानीत काही दिवसांपूर्वी कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजधानीत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांची साफ-सफाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच नव्या संसद भवनाला गळती लागली आहे. संसदेत काही ठिकाणी पाणी गळत असलेल्या ठिकाणी प्लॅस्टिकची भांडी ठेवण्यात असून याचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत गोंधळाचे वातावरण होते. शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला होता. नवीन संसद भवन संकुलातही पाणी साचले. पाऊस इतका झाला की छतावरून देखील पाणी गळू लागले होते. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला असून नव्या संसदेची तुलना जुन्या संसदेशी करण्यात आली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टकार समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लिहिले की, ’या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. त्यामुळे पुन्हा जुन्या संसदेत जाण्यास हरकत नाही. तो पर्यंत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या संसदेत साठेलेले पाणी देखील वाहून जाईल. भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक इमारतीच्या छतावरून टपकणारे पाणी हा त्यांनी केलेल्या विकास कामाचा भाग आहे का ? असा खोचक टोला देखील त्यांनी हा व्हिडिओ शेअर करून लगावला आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही यावर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, बाहेर पेपर लिक तर, आतमध्ये पाणी. राष्ट्रपतींद्वारे वापरण्यात येणार्‍या नव्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळत असून यामुळे या कामाचा दर्जा सिद्ध झाला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात या इमारतीतून पाणी गळू लागले आहे. या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला.

COMMENTS