मुंबई : नवी मुंबई, ठाण्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात

मुंबई : नवी मुंबई, ठाण्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात पाणी घुसले आहे. ठाण्यातील भारंगी नदीवर अचानक पाणी वाढल्याने अनेक वाहने वाहून गेली आहेत. सखल भागात देखील पाणी घुसल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन केले आहे. या पावसामुळे कल्याण कासारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने व काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नवी मुंबईत, ठाणे परिसरात शनिवार रात्री पासून जोरादर पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. आटगाव रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झाडे कोसळल्याने व रुळावर माती आल्याने या मार्गावरची लोकलसेवा ही ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचला आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे वासिंद-कसार्याकडे जाणारी रेल्वे वाहतूकीवर देखील परिमाण झाला आहे. रविवारी 6 पासून कल्याणहून कसार्याकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे. या मार्गावरची लोकल सेवा पुरवत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकणात जाणार्या सर्व गाड्या पावसामुळे रखडून पडल्या आहेत. मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस देखील पावसामुळे रखडली आहे. कसार्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणार्या अप साईडच्या गाड्या देखील विस्कळीत झाल्या आहेत.
COMMENTS