पुणतांबा ः स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असून मंगळवारी झालेल्य
पुणतांबा ः स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. पुणतांबेकरांच्या मागण्यांचा विचार रेल्वे खाते करीत असल्याचे रेल्वे स्टेशन प्रबंधक ठाकूर व शिर्डी पोलीस उपाधीक्षक शैलेश वमने यांनी मध्यस्थ करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. दोन गाड्या थांबण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र सर्व जलद गाड्या थांबवण्यात यावे या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक होते त्यामुळे आंदोलनावर तोडगा निघाला नाही. अखेर 15 ऑगस्ट आंदोलन करणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच आधी मागण्याबाबत 25 जुलै रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत 15 ऑगस्ट रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाची जनजागृती करण्यात आली होती. पुणतांबा सह परिसरातील पंधरा-वीस खेडेगावातील ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. पुणतांबाला जंक्शनच्या दर्जा असला तरी एकच गाडी थांबते त्यामुळे पुणतांबाकरांच्या संतप्त भावना असून रेल्वे रोको आंदोलनाबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पुणे मुंबई तसेच रेल्वेमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आली होती. पंधरा दिवसात रेल्वेने दखल घेतली नाही, 15 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनाच्या नियोजनासाठी मंगळवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर जलद गाडीला थांबा मिळावा तसेच आधी मागण्याबाबत ग्रामस्थांनी त्री व भावना व्यक्त करून रेल्वे रोको आंदोलन होणार असल्याची जाहीर केले तीन तास चाललेल्या ग्रामसभेत सर्वांनी आक्रमकपणे मुद्दे मांडून रेल्वेच्या लढ्यासाठी सर्व गाव एकत्र आले. मंगळवारी झालेल्या ग्रामसभेला सरपंच स्वाती पवार उपसरपंच निकिता जाधव माजी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वाहडने कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS