Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध भेसळीवर कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात छापे

4 लाख 14 हजार रुपयांचे भेसळ असलेले दूध केले नष्ट

कोपरगाव शहर ः दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक मोठ्या अडचणीत असताना काही बोटावर मोजण्या इतके दूध संकलन करणारे चालक आपल्या स्वतःच्या आर्

जिल्हा परिषदेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे गणवेश
राजर्षी शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीचा पाया घातला – प्राचार्य टी. एस. पाटील
शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे

कोपरगाव शहर ः दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक मोठ्या अडचणीत असताना काही बोटावर मोजण्या इतके दूध संकलन करणारे चालक आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दूध संकलन केलेल्या दुधामध्ये वेगवेगळे रासायनिक घटक मिसळून दुधाची कॉन्टिटी वाढवत ते दूध विक्री करून सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत असतात यातून अनेक आजार लहान मोठ्यांना होत असुन याच गोष्टीची दखल अहमदनगर येथील दूध भेसळ समितीच्या पथकाने मागील आठवड्यात घेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 11 दूध संकलन केंद्रावर राहुरी तालुक्यातील 3 दूध संकलन केंद्रावर व तर कोपरगाव तालुक्यातील 3 दूध संकलन केंद्रावर छापे टाकत यातील काही ठिकाणचे संशयीत भेसळ दूध नमुने पुढील तपासणी साठी पाठवण्यात आले तर 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 13 हजार 800 लिटर भेसळयुक्त दूध जेसीबीच्या साहाय्याने जमिनीमध्ये नष्ट करण्यात आले असुन दूध भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्र चालकांच्या विरोधातील जोरदार कारवाई मुळे भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्र चालकासह भेसळ करणार्‍या खाजगी दूध उत्पादक वाल्याचे देखील धाबे दणाणले आहे.

सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्हा दूध भेसळ समितीच्या पथकाने रविवार दि 28 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन व जगदंबा माता दूध संकलन केंद्रातील गाईच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले तर शिलेगाव येथील पतंजली दूध संकलन केंद्राची पाहणी अधिकार्‍यांनी केली असून या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी पी.बी.पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस पालवे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनोने यांचा समावेश होता. गुरुवार 1 ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यातील साई अमृत संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र व जवळके येथील मोठेबाबा मंदिराजवळील प्रशांत भागवत शिंदे यांच्या गाईच्या गोठ्यावरील संशयित दुधाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले असून सदरची कारवाई  अन्नसुरक्षा अधिकारी श्री.बढे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनोने  यांनी केली आहे. तर रविवार 4 ऑगस्ट रोजी दूध भेसळ समितीच्या पथकाने एकूण 11 ठिकाणी कारवाई करत यात कर्जत तालुक्यातील कृष्णाई दूध शीतकरण केंद्रावरील संशयित दुधाचे नमुने तपासणीसाठी घेत 33 हजार रुपयांचे 1 हजार 200 लिटर दूध नष्ट केले. मिरजगाव येथील श्री गजानन महाराज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेत 1 लाख 36 हजार रुपयांचे 4 हजार 200 लिटर दूध नष्ट केले. मिरजगाव येथील ग्रोवन मिल्क प्रॉडक्ट येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेत 1 लाख 38 हजार रुपये किमतीचे 4 हजार 600 लिटर दूध नष्ट केले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भगवान कृपा दूध संकलन केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेत 1 लाख 14 हजार रुपये किमतीचे 3 हजार 800 लिटर दूध नष्ट केले. तर जगदंबा दूध संकलन केंद्र कर्जत, साईबाबा दूध संकलन केंद्र व अन्वेषा दूध संकलन केंद्र दूरगाव कर्जत, कुळधरण येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्र, कर्जत येथील सद्गुरु मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, बहिरोबावाडी येथील नागराबाई यादव दूध संकलन केंद्र या ठिकाणच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.तर कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राची अधिकार्‍यांनी पाहणी केली असून या कारवाईमध्ये अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार यासह तीन नायब तहसीलदार, सात तलाठी, सात मंडलाधिकारी, एक अव्वल कारकून,एक महसूल सहाय्यक, पाच पोलिस कर्मचारी तसेच अन्नसुरक्षा अधिकारी बडे, कुटे, पवार तर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी केली आहे.

COMMENTS