नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्ली पोलिसांनी काल मंगळवारी न्यूजक्लिक या ऑनलाईन पोर्टलच्या कार्यालयावर आणि काही पत्रकारांच्या घरी छापेमारी केल्यामुळे ख

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्ली पोलिसांनी काल मंगळवारी न्यूजक्लिक या ऑनलाईन पोर्टलच्या कार्यालयावर आणि काही पत्रकारांच्या घरी छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पोर्टलवर भारतात चीनच्या प्रचारासाठी कोट्यावधी रूपये कोट्यवधी रुपये ओतणारा अमेरिकी अब्जाधीश नेव्हील रॉय सिंघम याच्याशी संबंधांवरून व बेकायदा निधी जमविल्याचा मुख्य आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत, अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडीने यापूर्वी फंडिंगच्या प्रकरणात न्यूजक्लिकच्या कार्यालयावर छापे टाकले होते व निधीच्या स्त्रोतांची चौकशी केली होती. त्याच चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे टाकले असून नव्याने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेबसाइटशी कथितपणे लिंक असलेल्या 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. पोलिसांनी सांगितले न्यूजक्लिकशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना नोटीस दिली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या याचिकेवर ही नोटीस देण्यात आली आहे. याचिकेत पोलिसांनी न्यायालयाचा अंतरिम आदेश मागे घेण्याचे आवाहन केले होते, ज्यामध्ये वृत्त साईटवर कडक कारवाई करण्यास बंदी घालण्यात आली होती. या वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांनी ट्विट केले आहे की पोलिसांनी त्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत आणि त्यांचे मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.खरेतर, 7 जुलै 2021 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने प्रबीर पुरकायस्थ यांना अटक न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकार्यांच्या सूचनेनुसार पुरकायस्थ यांना तपासात सहकार्य करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते. दिल्ली पोलिसांच्या याचिकेनंतर न्यायालयाने याप्रकरणी पुरकायस्थकडून उत्तर मागितले होते.
संसदेत गाजला होता न्यूजक्लिकचा मुद्दा- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 7 ऑगस्टला लोकसभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी न्यूजक्लिकला चिनी निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. शेजारी देशांच्या पैशाने देशात पंतप्रधान मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्यात आल्याचे दुबे म्हणाले होते. शेजारील देशातून बातम्यांच्या वेबसाइटवर पैसे आल्याचा आरोप केला होता.
पत्रकार अभिसार शर्मा आणि उर्मिलेशला घेतले ताब्यात- दिल्ली पोलिसांनी काही पत्रकारांचे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कमधील डम्प डेटासह इतर काही इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. पत्रकार अभिसार शर्मा आणि उर्मिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दिल्ली पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी यूएपीए व अन्य कलमांतर्गत न्यूजक्लिकवर गुन्हा दाखल केला होता. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे व गुन्हेगारी कटाचा ठपका न्यूजक्लिकवर ठेवण्यात आला होता. त्याच अंतर्गत आता कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
COMMENTS