Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदपुरात 11 जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा

45 जणांविरोधात गुन्हा दाखल

लातूर प्रतिनिधी - अहमदपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये 11 वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व

बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

लातूर प्रतिनिधी – अहमदपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये 11 वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना या अवैध धंद्यावर पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली. या छापेमारीत 45 व्यक्तींच्या विरूद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 लाख 7 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अहमदपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात व अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविली. अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या माहितीवरून अहमदपूर पोलिस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या 11 ठिकाणी अचानकपणे छापा मारले असता तेथे वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना सूरज हिरालाल राऊत्रे रा. गवळी गल्ली, अहमदपूर, सोनू ओमलाल राऊत्रे, शुभम राऊत्रे दोघे रा. गवळी गल्ली, अहमदपूर, अष्टवीनायक प्रकाश गायकवाड रा. महेबुबनगर, अहमदपूर, विशाल अर्जुन सरकाळे रा. सिध्दार्थनगर, अहमदपूर, मारोती व्यंकट गायकवाड रा. हाळणी, ता. अहमदपूर, कुमार संदिपान गायकवाड रा. तळेगाव, संजू विठ्ठल पोतणे रा. तळेगाव, ता. अहमदपूर, दिलीप यादव गायकवाड रा. काळेगाव, ता. अहमदपूर, बळीराम मारोती देवकत्ते, शेख जानीमिया अहमद दोघे रा. विळेगाव, ता. अहमदपूर, बाबू मेहबूब शेख रा. फत्तेपुरा, ता. अहमपूर, खलील जमील सय्यद रा. मेहबूबनगर, अहमदपूर, बाबा मेहबूब सय्यद, रा. फत्तेपुरा, ता. अहमदपूर, प्रल्हाद किशनराव पोतवळे, रा. बेलुर, ता. अहमदपूर, रवी बनसोडे रा. अहमदपूर, अमीरअली अहमद अली लष्करी बबलू ऊर्फ हबीब खेजर हबीईसा चाऊस दोघे रा. गडी गल्ली अहमदपूर, अहमदपूर, दताजय सीताराम वाघमारे रा. सुनेगाव सांगवी, ता. अहमदपूर, बलराम रूपलाल बटावाले रा. महादेव गल्ली, अहमदपूर, रामेश्वर काशीराम गोविंदवाड रा. नांदूरा ता. अहमदपूर, साहेबराव सुभाष सूर्यवंशी, देविदास शिवाजी चव्हाण रा. रूई तांडा ता अहमदपूर, बापूराव मारोती केंद्रे, रा. ब्राह्मवाडी ता. अहमदपूर, नागोराव शामराव तरडे रा. थोडगा ता. अहमदपूर, विजय बळीराम सोमवंशी रा. लाईन गली, अहमदपूर, बालाजी किशनराव बटावाले रा. हामणे गली, अहमदपूर, ईम्राण लतीफ बायजित रा. अहमदपूर, सोहेल शेख रा. अहमदपूर, फारूख शेख रा. अहमदपूर, अमर नारायण कांबळे रा. चापोली, संपत दशरथ बनसोडे रा. बौध्द नगर अहमदपूर, संग्राम नागनाथ वाघमारे रा. परचंडा ता. अहमदपूर, कमलाकर सोपान आचार्य, मारोती वैभव कोत रा. बेलुर ता. अहमदपूर, ज्यावेद इमामसाब चौधरी रा. न्यु बागवान कॉलनी अहमदपूर, कलीम गौस शेख रा. महेबुब नगर अहमदपूर, दाऊत मैनोचीन सय्यद रा. न्यू बागवान कॉलनी अहमदपूर, शकील गुलाबसाब शेख रा. सिंदगी, रुक्माजी नागनाथ वाघमारे रा. नांदुरा, लक्ष्मण जळभा पेडलवाड रा. चारटांगी अहमदपूर, नितीन गंगाराम चरवाचारपटे, गणेश मदनलाल बरटिये दोघे रा. चदंडा नगर अहमदपूर, अतिक शेख रा. अहमदपूर, देवा भगत रा. अहमदपूर हे आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 2 लाख 7 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS