राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष

सासरे विधानपरिषदेचे तर, जावई विधानसभेचा अध्यक्ष

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले असून, पहिल्याच दिवशी विधानसभेच्या अध

आमदारांच्या अपात्रतेवर दिरंगाई नाही
राजकीय फटाके फुटायला अजून वेळ
अपात्रतेचा निर्णय नियमांनुसारच होईल

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले असून, पहिल्याच दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. भाजप आणि शिंदे गटाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती, तर शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 तर साळवी यांना 107 मते पडली. तर 3 आमदार तटस्थ राहिल्यामुळे नार्वेेकर विजयी होत विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष झाले आहेत.
शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला होता. आमच्याकडे संख्याबळ अधिक असल्यामुळे आम्हाला व्हीप लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले होते. राहुल नार्वेकर यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत.

COMMENTS