Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती

चेन्नई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असून, आचारसंहितेची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असतांना सोमवारी तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये निव

आईचे क्रूर कृत्य, पोटच्या मुलीला मध्य प्रदेशात 80 हजारांना विकले | LOK News 24
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार
अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

चेन्नई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असून, आचारसंहितेची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असतांना सोमवारी तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये निवडणूक अधिकार्‍यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. राहुल गांधी हेलिकॉप्टरमधून केरळच्या वायनाडमध्ये चालले होते. पोलिसांनी सांगितले की, ’तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर लँडिग झाल्यानंतर निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली.
तामिळनाडूत ते रोडशोमध्येही सहभागी झाले होते. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी संसदेत वायनाड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. राहुल गांधी यंदा देखील केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकभेच्या रिंगणात उतरले आहेत. या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एनी राजा यांच्याशी होणार आहे. सीपीआय हा पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष देखील आहे. केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे.

COMMENTS