अंबरनाथ/प्रतिनिधी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम दिसतोय, असे मत महारा

अंबरनाथ/प्रतिनिधी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम दिसतोय, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आज अंबरनाथ येथे पक्ष संघटनेचे आढावा राज ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, माध्यमांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी कर्नाटकात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसत आहे. राज ठाकरे म्हणाले, मी यापूर्वी म्हणालो होतो की कोणत्याही निवडणुकीत विरोधी पक्ष जिंकत असतो. सत्ताधारी पक्ष हरत असतो. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या स्वभाव, वागणुकीचा पराभव झाला आहे. आपल कोणी वेडेवाकडे करू शकत नाही, अशी भाजपची समजूत होती. मात्र, जनतेला कुणी गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल का? या प्रश्नांवर राज ठाकरे म्हणाले की, कर्नाटक ही त्या राज्याची निवडणूक होती. महाराष्ट्रात किंवा लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम होतील की नाही, हे आताच सांगू शकत नाही. दरम्यान, पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते मुनगुंटीवार यांनी केले आहे.
COMMENTS