राहाता : नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण करण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्यावतीने प्रथमच अत्याधुनिक LiDAR तंत्रज्ञानासह GIS आधारित सर्वेक्षणाचा प्रारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला आहे.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुजय विखे यांच्या सूचनेनुसार राहाता शहरामध्ये मालमत्ता सर्वेक्षण सुरू करण्यात आहे. या सर्वेक्षणामध्ये LiDAR तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच महाराष्ट्रमध्ये राहाता नगरपरिषद करत आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तेची अचूक माहिती, मालमत्तांचे डिजिटल नकाशांकन होणार आहे. भविष्यातील शहर नियोजनासाठी अचूक डेटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी सर्वेक्षणाची माहिती देताना मुख्याधिकारी वैभव लोंढे म्हणाले की, राहाता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या परवानगीनंतर कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लि. अमरावती यांच्या मार्फत राहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण शहराचे LiDAR या प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे हवाई छायाचित्रण करण्यात येत आहे. करमूल्यांकनाच्या कामाकरिता अचूक मोजमाप, नकाशांकन व माहिती संकलन करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शहरातील जमिनीवरील इमारती, रस्ते, मोकळी जागा, झाडे इत्यादींचे अत्यंत अचूक छायाचित्रण घेऊन नकाशांकन केले जाणार असून पारंपरिक सर्वेक्षणापेक्षा अधिक वेगवान, अचूक व पारदर्शक माहिती संकलित होणार आहे. सदर ड्रोन फ्लाय कार्यक्रम माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक नितीन गाडेकर,नानासाहेब टिक्कल, कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा.लि. चे संचालक सचिन तुपटकर, प्रकल्प व्यवस्थापक ऋषभ गोमासे, कार्तिक पारधी, बापू वैजापूरकर, विरेश बोठे, सुभाष कुलकर्णी, संकेत शिंदे, सचिन मोरे, रेवणनाथ शिंदे आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

राहाता : नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण करण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्यावतीने प्रथमच अत्याधुनिक LiDAR तंत्रज्ञानासह GIS आधारित सर्वेक्षणाचा प्रारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला आहे.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुजय विखे यांच्या सूचनेनुसार राहाता शहरामध्ये मालमत्ता सर्वेक्षण सुरू करण्यात आहे.
या सर्वेक्षणामध्ये LiDAR तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच महाराष्ट्रमध्ये राहाता नगरपरिषद करत आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तेची अचूक माहिती, मालमत्तांचे डिजिटल नकाशांकन होणार आहे. भविष्यातील शहर नियोजनासाठी अचूक डेटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सर्वेक्षणाची माहिती देताना मुख्याधिकारी वैभव लोंढे म्हणाले की, राहाता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या परवानगीनंतर कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लि. अमरावती यांच्या मार्फत राहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण शहराचे LiDAR या प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे हवाई छायाचित्रण करण्यात येत आहे. करमूल्यांकनाच्या कामाकरिता अचूक मोजमाप, नकाशांकन व माहिती संकलन करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शहरातील जमिनीवरील इमारती, रस्ते, मोकळी जागा, झाडे इत्यादींचे अत्यंत अचूक छायाचित्रण घेऊन नकाशांकन केले जाणार असून पारंपरिक सर्वेक्षणापेक्षा अधिक वेगवान, अचूक व पारदर्शक माहिती संकलित होणार आहे.
सदर ड्रोन फ्लाय कार्यक्रम माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक नितीन गाडेकर,नानासाहेब टिक्कल, कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा.लि. चे संचालक सचिन तुपटकर, प्रकल्प व्यवस्थापक ऋषभ गोमासे, कार्तिक पारधी, बापू वैजापूरकर, विरेश बोठे, सुभाष कुलकर्णी, संकेत शिंदे, सचिन मोरे, रेवणनाथ शिंदे आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

COMMENTS