Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता बस स्थानकाचा वर्धापन दिन उत्साहात

राहाता ः राहाता बस स्थानकामध्ये लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. या गोष्ट

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी
मीनाक्षी अवचरे यांना राज्यस्तरीय झाशीची राणी पुरस्कार प्रदान

राहाता ः राहाता बस स्थानकामध्ये लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. या गोष्टीला आज 76 वर्ष पूर्ण होत असून 1 जून हा दिवस वर्धापन दिन म्हणून राज्यभरात मोठ्या उत्साहात राज्यात साजरा होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या पुढाकारातून हा वर्धापन दिन राहाता बस स्थानकात सकाळी 9 वाजता साजरा करण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, किरण राऊत वाहतूक नियंत्रक, भानुदास गाडेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते एसटी ड्रायव्हर तसेच एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सखाराम तारगे, प्रकाश घावडे,साहेबराव गाडेकर,यांचा फेटा,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांनी राहाता बस स्टँडचे रूपडे बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे. यावेळी गाडेकर यांनी बोलताना म्हटले की राहाता शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी बस डेपो करण्यात यावा ही शहरातील नागरिकांची व ग्रामस्थांची मागणी असून परिवहन महामंडळाने त्यासाठी प्रयत्न करावे  असे बोलताना म्हटले. तर बसस्थानकांवरील प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना यांना पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. वर्धापन दिनानिमित्त  बस स्थानकाच्या परिसरात सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. तसेच बस स्थानक, फुला- पानांची तोरणे बांधून सजविण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, गेली 76 वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे  व इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरक्षित तसेच अविरतपणे करत आहे. लोकांमध्ये एसटी महामंडळाबद्दल एक विश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसा गणित वाढत आहे. यावेळी प्राथमिक स्वरूपात श्रीरामपूर- सुरत या बसचे उपस्थित महिलांच्या हस्ते ओक्षण करून गाडीला पुष्पहार  घालण्यात आला. या कार्यक्रमासाठी विष्णु सदाफळ, रंगनाथ सदाफळ, सुनील देशमुख, पारस सोळंकी,चांगदेव पाडेकर, अनिल सोमवंशी, बन्सी सेठ कुंभकर्ण, अशोक बोबडे, चंद्रकांत सुराशे, शारदा शाळेचे प्राचार्य तोरणे, गणेश तुपे, सचिन लोखंडे, सोनू पीडियार, दिनेश डोंगरे, रवींद्र गाडेकर, संगीता मंडलिक, सौ.पूनम अंत्रे,बस कंट्रोलर किरण राऊत, 36 बेसफोर्ड बसवरून सुरू झालेल्या एसटीच्या ताफ्यात तब्बल 15 हजार बस असून 87 हजार एसटी कर्मचार्‍यांचा काम करीत आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटांवर मात करत राज्याच्या डोंगरदर्‍यातील वाड्या-वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी सेवा देत आहे.या बसेसच्या माध्यमातून 560 पेक्षा जास्त बसस्थानकांवरून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार अशा 30 पेक्षा जास्त समाजघटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये 33 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. लवकरच या मध्ये ई बसेस ताब्यात दाखल होत आहे. या ई बसेसमुळे प्रवाशांना अधिक आरामदाय प्रवास करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक नियंत्रक किरण राऊत, कोपरगाव डेपोचे प्रमुख यांत्रिक कारागीर राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS