अमरावती ः अमरावतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. दोन जिल्हाप्रमुखांमध्ये रात्री वाद झाल्याचे समोर आलं आहे

अमरावती ः अमरावतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. दोन जिल्हाप्रमुखांमध्ये रात्री वाद झाल्याचे समोर आलं आहे. जिल्हाप्रमुख गोपाल अरबट आणि अरुण पडोळे यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शनिवारी 20 जुलै रोजी रात्री घडल्याची समजते. जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलांसह काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केलाय. गोपाल अरबट यांनी हा आरोप अरुण पडोळे यांच्यावर केला. याप्रकरणी गोपाल अरबट यांनी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
COMMENTS