Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी पुंजाहरी शिंदे

श्रीरामपूर प्रतिनिधी ः माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार्‍या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी भोकरचे प

कामगार सहकारी पतपेढीच्या नामविस्तार फलकाचे उद्घाटन
चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लैंडिंगचा राहात्यात जल्लोष
कोपरगावमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

श्रीरामपूर प्रतिनिधी ः माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार्‍या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी भोकरचे पुंजाहरी शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. अशोक कारखान्याच्या व्हॉईस चेअरमन पदावर शिंदे यांच्या रूपाने दुसर्‍यांदा माळी समाजात संचालकास मुरकुटेंकडून संधी मिळाली आहे.
काही महिन्यापूर्वी अशोक कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली ,त्यात मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आले. अशोक कारखान्याचे सूत्रधार माजी चेअरमन भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज भोकरचे माजी सरपंच पुंजाहरी शिंदे यांची कारखान्याच्या व्हॉईस चेअरमन परी निवड करण्यात आली पुंजाजी शिंदे हे भोकरचे माजी सरपंच असून त्यांची कारखान्याचे संचालक म्हणून ही दुसरी टर्म आहे. अशोकचे माजी संचालक स्वर्गीय दाजीबा मुरलीधर शिंदे यांचे पुंजारी शिंदे हे पुतणे आहेत. पुंजाहरी शिंदे यांच्या रूपाने माळी समाजाच्या संचालकाला दुसर्‍यांदा अशोकच्या व्हाईस चेअरमनपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी बेलापूरचे जालिंदर बंडेराव कुर्‍हे यांना अशोकच्या व्हाइस चेअरमन पदाची संधी मिळाली होती.

मुरकुटे ससाने गटाला मिळणार ताकद ! – लवकरच श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. किंबहुना निवडणूक आयोगाने शिवसेने संदर्भात दिलेल्या निर्णयामुळे कधीही पालिकेची निवडणूक लागू शकते,अशी शक्यता निर्माण झाल्याने अशोक कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी माळी समाजाच्या संचालकाला संधी मिळाल्याने, हा निव्वळ योगायोग नसून, आगामी शहराच्या राजकारणासंदर्भात याला विशेष महत्त्व दिले जात आहे. कारण गेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून मुरकुटे ससाणे यांची युती झाली आहे शहरात दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुरकुटे यांच्या निर्णयाला पालिका निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.या निवडणुकीमुळे मुरकुटे ससाने युतीला बळ मिळेल काय? अशी ही चर्चा सुरू आहे.

COMMENTS