कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 20
कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 20 लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.306/2019 दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अनिल तानाजी खैरे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगाव येथील न्यायाधीश भगवान धों.पंडित यांनी आरोपीस 6 महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस 25 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.
COMMENTS