Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील दोघांसह आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना शिक्षा

पुणे ः आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करणारे, देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने श

दुसर्‍यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही
इंटरपोलने मुंबईतील तरुणाला आत्महत्येपासून रोखले
पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?

पुणे ः आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करणारे, देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. यात पुण्यातील एका तरुणीसह दोघांचा समावेश आहे. जहानजेब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे), नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दूर बसित अशी आरोपींची नावे आहेत. मार्च 2020 मध्ये दिल्ली पोलिसांनी जहानजेब वाणी व त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपी देशातील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री हे त्यात सहभागी असल्याचे उघडकीस आले होते. या दोघांना एनआयएच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती. नंतर बंगळुरूतील डॉ. अब्दुर रहमान याचेही नाव निष्पन्न झाले.

COMMENTS