Homeताज्या बातम्यादेश

पॅराग्लायडर अपघातात पुण्याच्या पर्यटकाचा मृत्यू

कुल्लू : पॅराग्लायडर अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे मृत्यू झाला. सूरज शाह (वय 30 ) असे या पर्यटकाचे नाव आहे.  यासं

वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर भीषण अपघात
चार राज्यांमध्ये वादळामुळे विध्वंस
पीईएसचे अध्यक्ष रामदास आठवले ; राज्य सरकारचे शिक्कामोर्तब

कुल्लू : पॅराग्लायडर अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे मृत्यू झाला. सूरज शाह (वय 30 ) असे या पर्यटकाचे नाव आहे.  यासंदर्भात कुल्लू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या पुण्यातील एका पर्यटकाने डोभी पॅराग्लायडिंग पॉईंटवरून पायलटसोबत उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पॅराग्लायडर अनियंत्रित होऊन हा अपघात घडला.


 यात पायलट आणि पर्यटक दोघेही जखमी झाले, त्यांना उपचारासाठी प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी जखमी झालेल्या सूरज शाह याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृत पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

COMMENTS