Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे पोलिस गुन्हेगारी पॅटर्न मोडीत काढणार ः पोलिस आयुक्त रितेशकुमार

पुणे ः शहरातील गुन्हेगारीचा पॅटर्न सध्या बदलतांना दिसून येत आहे. कोयता गँगच्या दहशतीनंतर, इतर गुन्हेगारांचा देखील गुन्हेगारी करण्याकडे कल वाढतांन

मुंबई पोलिसांकडून भोजपुरी अभिनेत्रीला अटक
तलाठी भरती परीक्षेचा घोळ संपेना
परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले

पुणे ः शहरातील गुन्हेगारीचा पॅटर्न सध्या बदलतांना दिसून येत आहे. कोयता गँगच्या दहशतीनंतर, इतर गुन्हेगारांचा देखील गुन्हेगारी करण्याकडे कल वाढतांना दिसून येत आहे. पुण्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत आहे. पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड आणि अहमदनगरच्या गुन्हेगारीचा पॅटर्न सारखा आहे. ज्या प्रमाणे गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत आहे त्याप्रमाणे पुणे पोलिस काम करणार असून ती मोडीत काढणार अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलिस सह आयुक्त सतीश गोवेकर यावेळी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, गुन्हेगारी 100 टक्के संपणारी नाही. गुन्हे घडूच नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. तक्रारदारयांची तात्काळ तक्रार घेण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे थांबवू शकलो. अनेक योजनांची अंलबजावणी करण्यात येत आहे. यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे त्यांच्यासाठी परिवर्तन सारखे योजना आणल्या आहेत. बिट मार्शल, दामिनी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच माय सेल्फ पुणेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मागच्या 5 ते 7 वर्षांच्या विचार केला तर आर्थिक. सायबर गुन्हयाच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी लागणारे मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. यात आवड असणार्‍या अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना आर्थिक गुन्हे शाखेत घेण्यात येणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले. मुबई बरोबरचं पुण्याला सुद्धा सतत दहशतवादी कारवाईचा धोका असतो. यामुळे याकडे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवावे असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले. शहराचा वाढलेला विस्तार, पोलिस ठाण्यांची वाढलेली संख्या आणि कामाचा भार, यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयासाठी सध्याची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर सध्याचे आयुक्तालय आहे, त्याच जागे पुणे पोलिस आयुक्तालयासाठी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. मात्र, अद्याप त्याची सर्व प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार, हे निश्‍चित नाही.

COMMENTS