Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवर्‍यात

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आमदाराचा प्रभाव ; प्रांताधिकार्‍यांचा गंभीर आरोप

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अनेक प्रकरणात समोर येतांना दिसून येत आहे. जरंडेश्‍वर कारखान्याची पुन्हा चौकशी, पोर्शे

एकमुखी रुद्राक्षाच्या नावाखाली वसईत राजकीय नेत्याची 12 लाखांची फसवणूक | LOKNews24
ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण
 ड्रग्स प्रकरणात आमदार खासदार हप्ते घेतात 

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अनेक प्रकरणात समोर येतांना दिसून येत आहे. जरंडेश्‍वर कारखान्याची पुन्हा चौकशी, पोर्शे कारण दुर्घटनेत आरोप, त्यानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यासंदर्भात अजितदादांच्या आमदारांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. यात पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी मागणी कट्यारे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.  
तक्रारीत प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पी.एम.आर.डी.ए.चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. तसेच पुढे बोलतांना कट्यारे यांनी आरोप केला आहे की, सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणून सातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिले आहे. खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी खेड-आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत. त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांवर खेड-आळंदीच्या आमदारांचा प्रभाव – सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे. सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे, असे कट्यारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS