Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय जल अकादमीत’पाणी’ विशेषांकाचे प्रकाशन

कोपरगाव प्रतिनिधी ः जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने महाराष्ट्रातून 50 शिक्षकांची निवड करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर पुणे येथे पाण्याचा

आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रास्ता रोको
न्यू आर्ट्स महाविद्यालयात शैक्षणिक धोरणाविषयी कार्यशाळा उत्साहात
नगरकरांनो गाडी चालवताय तर १ चूकही पडू शकते महागात | LOKNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने महाराष्ट्रातून 50 शिक्षकांची निवड करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर पुणे येथे पाण्याचा योग्य वापर,पाणी प्रदूषण कसे रोखावे, पाण्याचे भविष्यकाळातील येणारे संकट व उपाययोजना याबाबत शाळेतून कोणकोणते उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर तसे कृतिशील संस्कार करता येतील याबाबत प्रशिक्षण  कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत बालसंस्कार महाराष्ट्र आयोजित ’पाणी’विशेषांकाचे प्रकाशन अकादमीचे संचालक मिलिंद पानपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या विशेषांकात ’पाणी’या विषयाचा विविधांगाने अभ्यास व्हावा म्हणून महाराष्ट्र भरातून लेख मागविण्यात आले होते.यात पाणी व्यवस्थापन पासून ते जलप्रदूषण, समस्या व उपाय, उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली आहे. यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी ही लेख लिहून आपला सहभाग नोंदवला असल्याची माहिती विशेषांक संपादिका सुनिता इंगळे यांनी दिली. सहसंपादक नवनाथ सूर्यवंशी यांनी या विशेषांकाचे डिझाईन व मुखपृष्ठ साकारले आहे. सुदाम साळुंके, सुशीला गुंड, सूर्यकांत बोईनवाड, अशोक शेटे यांचा हा अंक तयार करण्यात मोलाचा सहभाग आहे. या विशेषांकाची विशेष दखल घेत समारोपप्रसंगी अकादमीचे मुख्य अभियंता डी. एस. चासकर यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र भरातून आलेले प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक के.एस. चैतन्यसाहेब, जी. श्रीनिवास्तू, अफिफा सय्यद, एस. पी. सिंग, मिलिंद पानपाटील, डी.एस.चासकर उपस्थित होते. यावेळी भारत सरकारच्या वतीने राज्यातील शिक्षकांना नॅशनल वॉटर अकादमीचे मुख्य अभियंता डी.एस.चासकर यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

COMMENTS