Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये मनोरुग्ण महिलेवर अत्याचार

परप्रांतीय आरोपीवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर ः उत्तरप्रदेशमधून संगमनेरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीकडून एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला
खांद्यावर हात ठेवून दोघांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पळवली 

संगमनेर ः उत्तरप्रदेशमधून संगमनेरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीकडून एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार समोर आला असून पकडलेल्या आरोपीने सुरुवातीला पोलिसांना खोटे नाव सांगून तक्रारदार व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपले खरे नाव पोलिसांना सांगितले. प्रकाश रामनरेश निसाद (रा. पावबाकी रोड, संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, 42 वर्षीय पीडित महिला वेडसर असून ती आपल्या आईसह शहराच्या उपनगरात राहते. मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या आणि पतीपासून फारकत झालेल्या या महिलेच्या वेडसरपणावर रुग्णालयात उपचारदेखील सुरू आहे. सुरू असलेल्या औषधाच्या अंमलाखाली ते नॉर्मल असते. तिच्या या वेडसरपणाचा गैरफायदा आरोपीने घेतल्याचे दिसते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने या महिलेवर अत्याचार केला. दरम्यान काही वेळाने हा प्रकार बाहेरून घरी परतलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी बंद खोलीत असलेल्या पिडीतेला आवाज दिला. यावेळी ती मोठ मोठ्याने गाणे म्हणू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी खिडकीतून आठ डोकावले असता तिच्यासोबत एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांनी केलेल्या आरडाओरडीनंतर त्याला पकडून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.  चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सातपुते असल्याचे सांगून आपण प्लंबिंग कामाला आल्याचे सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याचे खरे नाव निष्पन्न झाले. त्याने पीडित महिलेवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. सलग दोन दिवसात संगमनेर शहरात एका अल्पवयीन व दुसर्‍या घटनेत महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

COMMENTS