Homeताज्या बातम्यादेश

बिहारसाठी बजेटमध्ये 26 हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली- अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारच्या बोधगयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र

लाच घेतांना बारामतीतील पोलिस हवालदार गजाआड
जे स्वत: उघडे पडलेत ते काय पोलखोल करणार? l LOK News 24
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

नवी दिल्ली- अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारच्या बोधगयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

COMMENTS