Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेतील 15 शाळांना संगणक संच प्रदान

आमदार सत्यजित तांबेंच्या निधीतून दिले संच

अकोले ः विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार निधीतून अकोले तालुक्यातील 15 शाळांमध्ये संगणक संच देण्यात आले. अ

राहुरी कृषी बाजार समिती होणार डिजिटल ः अरूण तनपुरे
तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | DAINIK LOKMNTHAN
Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका

अकोले ः विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार निधीतून अकोले तालुक्यातील 15 शाळांमध्ये संगणक संच देण्यात आले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते  मधुकरराव नवले यांचे प्रमुख उपस्थितीत बुवासाहेब नवले पतसंस्था सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारीणी सदस्य व बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेशराव जगताप, अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे, जनरल सेक्रेटरी संपतराव कानवडे, जिल्हा काँग्रेस सेक्रेटरी प्रा. बाळासाहेब शेटे, अकोले शहर काँग्रेस अध्यक्ष रामदास धुमाळ, तालुका सरचिटणीस सुजित नवले, उपाध्यक्ष रजनीकांत भांगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल नाईकवाडी, कोतुळ शहराध्यक्ष चांगदेव भाऊसाहेब देशमुख, दत्तात्रय चौधरी, मधुकर दराडे, सागर देशमुख, आबासाहेब मंडलीक, तुषार देशमुख, शाम देशमुख यांचेसह तुषार गायकर, उमेश नेहे, बाळासाहेब कांडेकर, गुंजाळ, निखील जोर्वेकर, के डी देशमुख, गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अमोल वैद्य, सागर शिंदे यांच्यासह सर्व शाळांचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी 15 शाळांमध्ये संगणक संच देण्यात आले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते  मधुकरराव नवले यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे यांनी केले

COMMENTS