Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी निदर्शने तिसऱ्या दिवशीही कायम 

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी संपामध्ये उतरले असून शहरातील कर्करोग रुग्णालय येथील परिचारि

लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे
मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू
जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली !

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी संपामध्ये उतरले असून शहरातील कर्करोग रुग्णालय येथील परिचारिका संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बनसोड म्हणाले की, ज्या नागरिकांनी आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या आमचे स्वागत केले अशांनीच आज आमच्यावर प्रश्न केले. यांना पेन्शन कशासाठी लागते तीस वर्ष आपली सेवा केली आणि तीस वर्षानंतर आम्ही काय काम करणार त्यामुळे जुनी पेन्शन दिली पाहिजे. रुग्णसेवा ही विस्कळीत झाली आहे यावर ते म्हणाले की शासनाला आम्ही संपाची कल्पना दिली होती. रुग्णांचे हाल होत नसून आपातकालीन सुविधा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तर शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा संप असाच सुरु राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

COMMENTS