Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक-मुंबई मार्गावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन

नाशिक ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई-नाशिक मार्गावरील खड्ड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पक्षाने मंगळवारी हा प्रश्‍न मार्

अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात महिलेचा गेला तोल 
राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे
पहाटेच्या शपथविधीचे अर्धसत्य

नाशिक ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई-नाशिक मार्गावरील खड्ड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पक्षाने मंगळवारी हा प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत विनाटोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन केले. त्यांनी हा महामार्ग रोखून धरत घोटी टोलनाका बंद पाडला. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या काही किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

COMMENTS