Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात बदलापूर घटनेचा निषेध

शेवगाव तालुका ः बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या अत्यंत घृणास्पद अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ व महाराष्ट्रातील महीला वरील वाढत्या अत्याचा

आम्हाला सहकार शिकवता, तुम्ही काय दिवे लावले ;-मा.आमदार चंद्रशेखर घुले
कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात
पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेला l पहा LokNews24

शेवगाव तालुका ः बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या अत्यंत घृणास्पद अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ व महाराष्ट्रातील महीला वरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने मुक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना व कॉग्रेस पक्षाच्या वतीने येथील आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडावर काळ्या रंगाची पट्टी बांधून मुक निदर्शने करण्यात आली. या वेळी शेवगावचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ अ‍ॅड सुभाष लांडे, जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. संजय नांगरे कॉ बबनराव पवार, दत्तात्रय आरे, कॉ. राम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिश भारदे, बाळासाहेब डाके, राहुल मगरे, शरद सोनवणे, एजाज काझी, संजय गवळी, रमेश ढाकणे, वजीर पठाण, अप्पासाहेब मगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते एकनाथ कुसाळकर, भारत लोहकरे, शिवाजी मडके, काँग्रेस (आय)चे धनंजय डहाळे, समीर काझी, कचरु मगर, आशा कर्मचारी गीता थोरवे, शितल थोरवे, सुनेत्रा महाजन, तारामती दिवटे,रत्नमाला क्षिरसागर आदिसह मोठ्या संखेने नागरिक ऊपस्थित होते.

COMMENTS