Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात 30 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर ः जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संप

जिल्ह्यात 4 सप्टेबंर  रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश लागू
अहमदनगरमध्ये 2 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
अहमदनगर जिल्ह्यात 17 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर ः जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे  कलम 37 (1) अन्वये 30 मे 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
            जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुक, मतदान, मतमोजणी व जयंती साजरी होणार आहेत. तसेच सभा, महासभा, आंदोलने इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 17 मे 30 मे 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.    या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे,  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी, व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुज्ञेय राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS