इस्लामपूर / प्रतिनिधी : दि इस्लामपूर अर्बन को-ऑप बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेने पलुस शाखेस मंजुरी मिळाली आहे. ही शाखा सहावी असून बँकेचे मार्गदर्
इस्लामपूर / प्रतिनिधी : दि इस्लामपूर अर्बन को-ऑप बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेने पलुस शाखेस मंजुरी मिळाली आहे. ही शाखा सहावी असून बँकेचे मार्गदर्शक स्व विजयभाऊ पाटील यांचे प्रेरणेतून बँक प्रगतीपथावर आहे. बँकेने सन 2022-2023 या संपलेल्या आर्थीक वर्षात तरतुदी पूर्व नफा 72 लाख इतका झाला असलेची माहीती बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.
संदीप पाटील म्हणाले, अनेक आव्हानांवर मात करून रिझर्व्ह बँकेच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून प्रगती साधली आहे. सध्या इस्लामपूर मुख्य शाखा यल्लामा चौक, एसटी स्टॅन्ड रोड, नेर्ले, बहे, सांगली या पाच शाखा कार्यान्वीत आहेत. इस्लामपूर अर्बन को-ऑप बँकेने नेहमीच सर्वसामान्यांचे हीत साधुन कामकाज केले आहे. 50 हजार ते दीड कोटीपर्यंत कर्ज पुरवठा करून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना उदयोग व्यवसाय शेती शेतीपुरक व्यवसाय उभे केले आहे. तत्त्पर व विनम सेवेतून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे.
सध्या बँकेकडे 53.90 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. तर 31.39 कोटी रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. प्रती सेवक व्यवसाय 2.70 कोटी रूपये इतका झाला आहे. ढोबळ एनपीए 3.98 इतका आहे. नेट एनपीए शून्य टक्के इतका आहे. सीआरएआर 18 टक्के इतका आहे. संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले, सर्वात सुरक्षीत अशी एपीआय बेसड आरटीजीएस व एनईएफटी सुविधा आमची बँक देत आहे. याशिवाय क्युआर कोड सीटीएस क्लिरींग एसएमएस या सुविधा सुरू आहेत. अल्पावधीत मोबाईल बैंकिंग सुविधा देण्यात येईल. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अशोक उरुणकर संचालक शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, छगनलाल रायगांधी, प्रदीप शहा, शंकर चव्हाण, शब्बीर पठाण, कृष्णकांत शिंदे, सौ. सुनंदा मोरे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड उपस्थीत होते.
लवकरच विजयभाऊंचे नांव…
स्व. विजयभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा वाढ विस्तार झाला. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सर्वसाधारण सभेत सभासदांनी बँकेस त्यांचे नांव देणेचा ठराव केला. त्यास रिझर्व बँकेकडुन ना-हरकत दाखला व सहकार खात्याकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच विजयभाऊ अर्बन को-ऑप. बँक लि. असे नामकरण होणार असल्याचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.
COMMENTS