Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. कैलास पवार यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी ः मेजर नंदकुमार सैंदोरे

श्रीरामपूर ः भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही सेवाभावी संस्था दीनदुःखितांची आधार सावली आहे. अशा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांन

दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित
धनादेश अनादर प्रकरणी लेखापरीक्षकाला एक वर्षाची शिक्षा ; आरोपी मुंबईतील लेखापरीक्षक
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

श्रीरामपूर ः भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही सेवाभावी संस्था दीनदुःखितांची आधार सावली आहे. अशा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानने सेवाभावी पुरस्कार व मानपत्राने सन्मानित केले, ह युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत भारतीय सैन्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे प्रा.कैलास पवार यांच्या सेवाभावी कार्याबद्दल सत्कार करताना मेजर नंदकुमार सैंदोरे बोलत होते. वाघुली येथील भूमी फाऊंडेशन कार्यालयात आयोजित सन्मान उपक्रमाविषयी प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगावसारख्या खेड्यात प्रा. कैलास पवार यांनी शेती, शेतकरी,शेतमजूर,गोरगरीब विद्यार्थी, संकटग्रस्त लोकांसाठी आदर्श कार्य सुरु केले, त्यामुळेच चित्रपट अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर, बचत गट मार्गदर्शन,वंचितांचे शिक्षण हाती घेतले, नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघुली येथे अनाथांचे वसतिगृह सुरु केले.त्यामध्ये 100विद्यार्थी आहेत.2020ते 22या कोरोनाकाळात अनेकांना मदतीचा हात दिला. एकल महिला, निराधार मुले, तृतीय पंथीय नागरिक यांना किराणा किट्स, शेळी व्यवसाय, वह्या, पुस्तके वाटप केले.धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, रस्तावरील भिकारी यांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशी कितीतरी कामे हीं सेवेचा आदर्श आहे, त्याबद्दल सन्मान केला असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी प्रा. पवार यांच्या सर्वकार्याला माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सुखदेव सुकळे, किशोर निर्मळ, आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बाबासाहेब चेडे आदींचे खूप सहकार्य आहे. पुण्यात अनेक उच्च अधिकारी या कार्याशी जोडले गेले आहेत, ह विशेष कौतुकास्पद आहे. प्रा. पवार यांनी सविस्तर विवेचन केले. मेजर नंदकुमार सैंदोरे यांनी वाघुलीचे कार्य पाहून कौतुक केले. अनिता पवार यांनी आभार मानले.

COMMENTS