जामखेड प्रतिनिधी ः समाजातील प्रत्येक घटकातील माणसाला सतत मदत करणारे, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे सामाजिक
जामखेड प्रतिनिधी ः समाजातील प्रत्येक घटकातील माणसाला सतत मदत करणारे, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पूणे बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा सचिन गायवळ यांचा वाढदिवस जामखेड तालुक्यात दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी 28 रोजी साकत येथील पांडुराजे भोसले यांच्या हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या गोशाळेला चारा दान करण्यात आला. तसेच मुकबधीर,मतीमंद शाळेत,व अनाथ आश्रमात जाऊन स्वतः सचिन गायवळ यांनी मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले. 29 रोजी खर्डा व नान्नज या गावात महाआरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नेत्रतपासणी, मुत्ररोग, मणक्याचे आजार, अस्थिरोग,कान, ह्रदयरोग तसेच जनरल आजारांच्या मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. प्रत्येक रूग्णांची विशेष करून वृध्द व गरिब रूग्णांची सचिन गायवळ यांनी अस्थेवाईक विचारणा केली. यामध्ये देवयानी मल्टीस्पँशालिटी हाँस्पीटल व नान्नज खर्डा येथील डॉ आसोशिएशनचे सहकार्य लाभले. यावेळी सामजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यावेळी नान्नज खर्डा पंचक्रोशीतील अनेक गावातील हजारांवर रूग्णांनी महाआरोग्यशिबीराचा लाभ घेतला व प्रा सचिन गायवळ सरांना खुप खुप आशिर्वाद दिले.
COMMENTS