Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.डॉ. शेळके यांना ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार 

अकोले : अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आणि साहित्यिक- समीक्षक डॉ. भास्कर शेळके यांना अमृतवाहिनी व उर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ने गौरविण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील सातत्यपूर्ण शैक्षणिक उत्कृष्टता नवोपक्रमशील उपक्रमांतर्गत तसेच विद्यार्थी व सामाजिक विकासासाठी केलेल्या परिवर्तनशील योगदानाबद्दल अलिकडेच संपन्न झालेल्या कळस कृषी प्रदर्शन औचित्याने प्राचार्य डॉ भास्कर शेळके यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांची आजवर वीस पुस्तके प्रकाशित झाली असून साहित्य, संशोधकीय, समीक्षेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे. अगस्ती महाविद्यालयात सातत्याने विद्यार्थी हितासाठी शिक्षण पूरक उपक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत. कै. मधुकरराव पिचड यांच्या संकल्पनेतून कर्मवीर भाऊराव पाटील धान्य किराणा संकलन योजना कार्यान्वित करुन महाविद्यालयात गरीब, वंचित मुलामुलींसाठी राहण्या जेवणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. प्राचार्य डॉ. शेळके यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त मधुकर सोनवणे, सुरेश कोते, संपतराव वैद्य, खजिनदार, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आणि अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले.

सुरज भवारी ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित
दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर
शेरणखेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर

अकोले : अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आणि साहित्यिक- समीक्षक डॉ. भास्कर शेळके यांना अमृतवाहिनी व उर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ने गौरविण्यात आले.

शिक्षणक्षेत्रातील सातत्यपूर्ण शैक्षणिक उत्कृष्टता नवोपक्रमशील उपक्रमांतर्गत तसेच विद्यार्थी व सामाजिक विकासासाठी केलेल्या परिवर्तनशील योगदानाबद्दल अलिकडेच संपन्न झालेल्या कळस कृषी प्रदर्शन औचित्याने प्राचार्य डॉ भास्कर शेळके यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.

प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांची आजवर वीस पुस्तके प्रकाशित झाली असून साहित्य, संशोधकीय, समीक्षेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे. अगस्ती महाविद्यालयात सातत्याने विद्यार्थी हितासाठी शिक्षण पूरक उपक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत. कै. मधुकरराव पिचड यांच्या संकल्पनेतून कर्मवीर भाऊराव पाटील धान्य किराणा संकलन योजना कार्यान्वित करुन महाविद्यालयात गरीब, वंचित मुलामुलींसाठी राहण्या जेवणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

प्राचार्य डॉ. शेळके यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त मधुकर सोनवणे, सुरेश कोते, संपतराव वैद्य, खजिनदार, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आणि अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले.

COMMENTS