Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. डॉ. रत्नमाला प्रकाश सोनवणे युरोपला रवाना

आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत घेणार सहभाग

मुंबई ः युरोप खंडातील स्विझरलँड या देशात आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद संपन्न होत असून या परिषदे साठी मुंबईतील महाराष्ट्र शासनाचे  होमी भाभा विद्या

नाट्य स्पर्धेत ईशान कोयटेची यशस्वी कामगिरी
तालुक्याच्या जडणघडणीत स्व.शिवाजीराव नागवडेंचे अतुलनीय योगदान – बाळासाहेब नाहाटा
संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

मुंबई ः युरोप खंडातील स्विझरलँड या देशात आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद संपन्न होत असून या परिषदे साठी मुंबईतील महाराष्ट्र शासनाचे  होमी भाभा विद्यापीठाच्या रसायन शास्त्रातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. रत्नमाला सोनवणे ह्या सोमवार सकाळी 3 जून रोजी रवाना झाल्यात. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील  प्राध्यापक व शास्त्रज्ञ  उपस्थित राहणार असून आपले शोध निबंध सादर करणार आहेत. प्रा. डॉ. रत्नमाला ह्या ही आपला शोध निबंध या परिषदेत सादर करतील.
या पूर्वीही प्रा. डॉ. रत्नमाला यांनी दुबई , बँकॉक येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत उपस्थित राहून आपले रसायन  शास्त्रातील शोध निबंध सादर करून नावलौकिक प्राप्त केला आहे. अभ्यास दौरा म्हणून त्या परिषद संपन्न झाल्यावर युरोप खंडातील विविध देशांना भेटी देणार आहेत.

COMMENTS