Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.डॉ.के.एच.शिंदे ‘रयत’च्या जनरल बॉडीवर

जामखेड : रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या जनरल बॉडी सदस्य पदी प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे यांची निवड करण्यात आली.  रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या ता. १८/०१/२०२६ रोजी झालेल्या बैठकीत ठराव  नुसार सेवानिवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून जनरल बॉडीचे सभासदपदी निवड झाली असे संस्थेने पत्रव्यवहाराद्वारे त्यांना कळवले.  गेल्या तब्बल ४२ वर्षांपासून बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा हा सन्मान मानला जात आहे.  शिक्षक, प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना डॉ. शिंदे यांनी शिक्षण, प्रशासन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. तसेच संशोधन क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महत्त्वाच्या जवाबदारया यशस्वीरीत्या पार पडलेल्या आहेत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन करून त्यांनी अर्थशास्त्र विषयात स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार मिळाले.  त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी निश्चितच होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराला धान्यपुरवठा?
बोगस ग्रामसभा दाखवून प्रशासनाची फसवणूक
शहरविकासाला प्राधान्य ; नियम सर्वांना सारखे : नगराध्यक्ष चिंतामणी

जामखेड : रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या जनरल बॉडी सदस्य पदी प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे यांची निवड करण्यात आली.  रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या ता. १८/०१/२०२६ रोजी झालेल्या बैठकीत ठराव  नुसार सेवानिवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून जनरल बॉडीचे सभासदपदी निवड झाली असे संस्थेने पत्रव्यवहाराद्वारे त्यांना कळवले.  गेल्या तब्बल ४२ वर्षांपासून बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा हा सन्मान मानला जात आहे.

 शिक्षक, प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना डॉ. शिंदे यांनी शिक्षण, प्रशासन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. तसेच संशोधन क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महत्त्वाच्या जवाबदारया यशस्वीरीत्या पार पडलेल्या आहेत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन करून त्यांनी अर्थशास्त्र विषयात स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार मिळाले.  त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी निश्चितच होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

COMMENTS