लोणी ः लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विषय
लोणी ः लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्रा अशोक लोळगे यांना राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. विजयकुमार रोडे आणि संघाचे राज्याध्यक्ष डॉ मिलिंद कांबळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक संघाचे दोन दिवसीय अधिवेशन लोणावळा येथे पार पडले.हिंदी विषयात बोर्डात सर्वोच्च गुण मिळवणारे अधिक विद्यार्थी व हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार तसेच उत्कृष्ठ अध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य बद्दल प्रा. अशोक लोळगे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबद्दल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी शालीनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे, प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे आदींनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS