Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लीया महाविद्यालयाचे प्रा.अमीर सलीम यांना पीएच.डी. पदवी प्रदान

बीड प्रतिनिधी - मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.अमीर सलीम यांना नुकतीच सनराइज युनिव्हर्सिटी अलवर राजस्थान

ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले
नव्या अध्यक्षांना अधिकार मिळतील का ?
ट्रक-तवेराची जोरदार धडक ; 7 जणांचा जागीच मृत्यू

बीड प्रतिनिधी – मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.अमीर सलीम यांना नुकतीच सनराइज युनिव्हर्सिटी अलवर राजस्थान विद्यापीठाने लायब्ररी सायन्स विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी मेरठ विद्यापीठातील संशोधन मार्गदर्शक डॉ. धरमवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील एकात्मिक विद्यापीठ ग्रंथालयासाठी माहिती तंत्रज्ञानातील रचना आणि विकासाचा अभ्यास (र्डीींवू ेप वशीळसप रपव वर्शींशश्रेिाशपीं ळप ळपषेीारींळेप ींशलहपेश्रेसू षेी रप ळपींशसीरींशव णपर्ळींशीीळीूं श्रळलीरीू ळप खपवळर) (स्टडी ऑन डिझाइन अँड डेव्हलपमेंट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर अँन इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी लायब्ररी इन इंडिया) या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले. ग्रंथपाल प्रा.अमीर सलीम हे महाराष्ट्र क्रिकेट मंडळाचे माजी सदस्य असून, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांनी एम.फील. पदवी, त्याचप्रमाणे 15 पेक्षा जास्त रिसर्च पेपर प्रकाशित केली असून पन्नास पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे व शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांचा संशोधन व सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. प्रा.अमीर सलीम यांना पीएच.डी.पदवी. प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीमबीन अहमदबीन महफुज, सचिव श्रीमती खान सबिहा बेगम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ.हुसैनी एस.एस.,नॅक समन्वयक डॉ.अब्दुल अनिस, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा.फरीद अहमद नहरी, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS