Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. दिलीप सोनवणे यांची’ देवमाणसं’ वाचून वाचकांनी आपल्या जीवनातील देवमाणसं चित्रित करावी ः डॉ. अशोकराव सोनवणे

श्रीरामपूर(वार्ताहर) - माणसांचं जग माणसांनीच सुखी केलं पाहिजे. त्यासाठी दुसर्‍यातील देवत्व पाहण्याची मानसिकता वाढली पाहिजे. संगमनेर येथील प्रा. द

याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा
belapur – लव्ह जिहाद प्रकरणी भव्य मोर्चा l LokNews24
अहमदनगरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

श्रीरामपूर(वार्ताहर) – माणसांचं जग माणसांनीच सुखी केलं पाहिजे. त्यासाठी दुसर्‍यातील देवत्व पाहण्याची मानसिकता वाढली पाहिजे. संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांनी शब्दबद्ध केलेली’ देवमाणसं’ वाचून सूज्ञ वाचकांनी आपल्या जीवनात भेटलेली देवमाणसं शब्दचित्रित करावी अशी अपेक्षा दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोकराव सोनवणे यांनी व्यक्त केली श्रीरामपूर येथील आसरा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्रा. दिलीप सोनवणे यांच्या’ देवमाणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केडगाव येथील हॉटेल अर्चना सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोकराव सोनवणे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन श्रीसरस्वतीमाता, श्रीसंत गोरा कुंभार आणि स्व.सुखदेव पांडुरंग सोनवणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय सूचना संकेत सोनवणे यांनी मांडली तर डॉ. प्रताप सोनवणे यांनी अनुमोदन दिले. स्वागत व प्रास्ताविक अरविंद सोनवणे यांनी केले. लेखक प्रा. दिलीप सोनवणे यांनी मान्यवरांचा शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार केले. व्यासपीठावर प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. अशोकराव सोनवणे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, आसरा प्रकाशनचे डॉ. शिवाजी काळे, डॉ. यशवंत कुंभार, प्रा मेधाताई काळे, प्राचार्य विश्‍वासराव काळे, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, कैलास वाकचौरे, ह.भ.प. मानसिंग महाराज इथापे, सौ. छायाताई सोनवणे, श्रीमती सिंधुताई सोनवणे,लेखक दिलीप सोनवणे, डॉ. प्रताप सोनवणे, संकेत सोनवणे आदिंच्या हस्ते’ देवमाणसं’ पुस्तकांचे प्रकाशन झाले. डॉ. अशोकराव सोनवणे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, माझे बंधू प्रा. दिलीप सोनवणे यांनी’ देवमाणसं’ हे पुस्तक लिहून त्यांच्या मनातलं देवपण शब्दबद्ध केले आहे. लेखक, पत्रकार हे समाजाचे दिशादर्शक असतात. त्यांचे लेखन हे अनेक काळासाठी दीपस्तंभीय असते. आमची पत्रकरिता ही सुळावरची पोळी आहे. स्पष्ट, सत्यदर्शी आणि समाजपोषक पत्रकारिता करताना अनेकदा कठीण प्रसंग आले. तुरुंगवास सोसावा लागला. एका कुंभाराची प्रसार माध्यमातील झुंज ही तळमळीची जडणघडण आहे, परंतु समाजातील देवमाणसांमुळेच ही पत्रकारिता मोठ्या श्रध्देने व परिश्रमाने गतिशील ठेवली आहे, प्रा. दिलीप सोनवणेसारखे कुंभार समाजातील प्रत्येकाने लिहिते व्हावे असे आवाहन त्यांनी करून प्रा. सोनवणे यांच्या लेखनावर आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळे, मेधाताई काळे, कैलास वाकचौरे, प्रा. डी.आर. जाधव, प्रा. दिलीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य टी.ई. शेळके म्हणाले, आमच्या हस्ते आणि माझ्या  अध्यक्षतेखाली प्रा. दिलीप सोनवणे लिखित’ देवमाणसं’ पुस्तकाचा सोहळा झाला, हा माझ्या जीवनातील अमृतानंद आहे. या पुस्तकात प्रा. सोनवणे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये, गुरुवर्या प्रा. मेधाताई काळे यांच्यासह 10 पुरुष व 12 स्त्री व्यक्तिचित्रे शब्दबद्ध केली आहेत, त्यामध्ये प्रा. सोनवणे यांनी त्यांची पत्नी छायाताई सोनवणे यांचा देवमाणसं स्वरूपात केलेला शब्दगौरव ही स्त्री सन्मानाची उच्चतर भावना आहे, आपल्या पत्नीला देवरुपात पाहणारे सोनवणे भारतीय संस्कृतीचा आदर्श सांगणारे आहेत असे गौरवोद्गार काढून पुस्तक प्रकाशन संपन्न झाल्याचे घोषित केले. यावेळी बबनराव गोरे, राजश्री सोनवणे, हेमलता सोनवणे, विमल सोनवणे, शिरीष सोनवणे, राहूल सोनवणे, बाळाजी गोरे, भारत जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, राजेंद्र जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, सोमनाथ जोर्वेकर, मोमीन महेमूद, डॉ. यशवंत कुंभार, डॉ. आशिष सोनवणे, डॉ. विशाखा सोनवणे, प्राजक्ता सोनवणे, रंगनाथ जाधव, शंतनू सोनवणे, आनंद सोनवणे, प्रशांत सोनवणे, डॉ. रिया सोनवणे, सुधीर जाधव, डॉ. अनुपमा सोनवणे, डॉ. उषाताई कुंभार आदीसह कुंभार समाजातील व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. सुखदेव पांडुरग सोनवणे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा पितृभक्तीचा आदर्श सांगणारा असल्याचे सांगून ह.भ.प. मानसिंग महाराज इथापे यांनी आपल्या प्रवचनातून मातृपितृ भक्तीचे विवरण केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सोनवणे यांनी केले तर अशोक सोनवणे यांनी आभार मानले.

COMMENTS