Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तनपुरे कारखाना बंद पाडणार्‍यांची चौकशी करा – विखे समर्थकांची मागणी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कर्जाच्या खाईत लोटून बंद पडलेला डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक अडचणींना सामोरे जात सक

९ लाखांचा गांजा जप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली कारवाई
12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कर्जाच्या खाईत लोटून बंद पडलेला डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे चालविला मात्र काही नाकर्त्या लोकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असून कारखाना बंद पडण्यास जबाबदार असणार्‍या सर्वांची चौकशी करावी, आंदोलन करर्त्यांचा बोलविता धनी कोण? हे देखील समोर आले पाहिजे  अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सुरेशराव बानकर व अमोल भनगडे यांच्यासह विखे समर्थक यांनी केली आहे. डॉ.तनपुरे कारखान्याच्या विविध मुद्द्यावर कारखाना बचाव समितीने उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तीव्र विरोध दर्शवत विखे समर्थक कार्यकर्त्यांनी व सभासदांनी तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन दिले.
     या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना व्यवस्थीत घालू असतांना काही विघ्न संतोषी मंडळी सातत्याने कारखान्याचे संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप करीत होते . त्यामुळे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांना 30 सप्टेंबर 2022 रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांना कारखाना चालविण्याचे खुले आव्हान दिले होते परंतु कारखाना विरोधकांनी चालू केला नाही किंवा चालू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे सिझन 2022-23 बंद राहीलेला आहे व त्यामुळे तालुक्याची बाजारपेठ उध्वस्त झालेली आहे. तसेच कामगारांचे व शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही शेतकरी मंडळी, चक्री उपोषण करणार आहेत. या उपोषणकर्त्याकडे कारखान्याची मोठया प्रमाणात बाकी आहे . त्यांचेवर व त्यांचे पाठीराखे यांचे वर सेक्शन 88 खाली कारवाई चालू आहे. या कारखान्याचे मोठया प्रमाणात नुकसान करून , काही नेत्यांनी त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना काढला असल्याचा आरोप यावेळी केला. यावेळी चेअरमन नामदेव ढोकणे, तानाजीराव धसाळ, सुरेशराव बानकर, अमोल भनगडे उत्तमराव मुसमाडे, महेंद्र तांबे, आशिष बिडगर, खा.डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर विखे, मनोज गव्हाणे आदींसह सभासद उपस्थित होते.

COMMENTS