Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्य डॉ. ढाकणे यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात

पाथर्डी ः महाविद्यालयांच्या शैक्षणिक धोरणात अनेक आमूलाग्र बदल झाले असून रोज नवीन कामांचा मोठा भार पडत असून दैनंदिन कामात समोर असणारी आव्हाने पेलव

प्रवरेच्या कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे
नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24
काळेंच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल : केदार

पाथर्डी ः महाविद्यालयांच्या शैक्षणिक धोरणात अनेक आमूलाग्र बदल झाले असून रोज नवीन कामांचा मोठा भार पडत असून दैनंदिन कामात समोर असणारी आव्हाने पेलवत सर्वांशी योग्य समन्वय साधत बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य जी पी ढाकणे यांनी आपल्यामध्ये सकारात्मकता ठेवून या महाविद्यालयाला शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सर्वांगिण विकास करत महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवले असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा बारामतीचे प्राचार्य देवीदास वायदंडे यांनी केले.
पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे यांच्या सेवापुर्ती समारंभ कार्यक्रम प्रसंगी वायदंडे बोलत होते.यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अँड. सुरेश आव्हाड,लक्ष्मण खेडकर, संजय बडे, राजेंद्र दौंड, कवी कैलास दौंड, प्राचार्य डॉ. शेषराव पवार, डॉ. आर.जे. टेमकर, संजय नगरकर, गोरक्षनाथ कल्हापुरे, अशोक दौंड, उपप्राचार्य डॉ. बबन चौरे, सुरेश मिसाळ, सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, गोरक्ष ढाकणे, संभाजी आव्हाड, भारत गाडेकर, मीना ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय आव्हाड म्हणाले की,प्राचार्य ढाकणे यांनी गेली अठरा वर्ष प्रामाणिकपणे सेवा देऊन स्वतःच्या कुटुंब प्रमाणे  महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्थेचे असणारे पदाधिकारी व त्यांच्यात योग्य समन्वय साधत त्यांनी सर्वांना सोबत घेत एक आदर्श कर्मचारी वर्ग कार्यान्वित केला आहे. प्राचार्य जी.पी ढाकणे म्हणाले, संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍याने माझ्यावर विश्‍वास टाकला आणि मला काम करण्यासाठी सर्व अधिकार दिले त्यामुळे मी सर्वांच्या सोबत राहून प्रामाणिक आणि चांगले काम करू शकलो. प्राचार्य ढाकणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक कानडे, सूत्रसंचलन प्रा. मन्सूर शेख तर आभार प्रा. सुरेखा चेमटे यांनी मानले.

COMMENTS