Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युवांशी साधणार संवाद

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या होणार्‍या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी ‘व

थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे गाड्यांना विलंब
राजधानीत धुक्यामुळे विमानसेवेला फटका
राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या होणार्‍या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’च्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी साडेचारच्या सुमारास हा कार्यक्रम होणार असून, यावेळी पंतप्रधान देश-विदेशातून आलेल्या सुमारे तीन हजार युवा प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत.
या संवाद सत्रात सहभागी झालेल्या युवकांमधून निवड करण्यात आलेले प्रतिनिधी राष्ट्रीय महत्त्वाच्या दहा विषयांवर आपली अंतिम मते आणि कल्पना पंतप्रधानांसमोर मांडणार आहेत. राष्ट्र उभारणीसाठी युवा नेतृत्वाचा दृष्टिकोन, नव्या संकल्पना आणि विकासाभिमुख विचार या सादरीकरणांतून अधोरेखित होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’च्या निबंध संग्रहाचे प्रकाशनही होणार आहे. या संग्रहात भारताच्या विकासाशी निगडित प्राधान्यक्रम, धोरणात्मक दिशा आणि दीर्घकालीन राष्ट्रनिर्मितीविषयी युवकांनी मांडलेले निवडक विचार समाविष्ट आहेत. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ची ही दुसरी आवृत्ती असून, युवा वर्ग आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्यात थेट संवाद घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

COMMENTS