Homeताज्या बातम्यादेश

एपस्टीन फाइल्समधे पंतप्रधान मोदींचे नाव नाही

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त जयस्वाल यांनी फेटाळले आरोपनवी दिल्ली : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी संबंधित तपास कागदपत्रे सार्वजनिक

भाजपच्या विकास मॉडेलवर झेन-जी पिढीचा विश्‍वास ः पंतप्रधान मोदी
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौर्‍यावर
अमेरिकेतही मोदी, मोदीचा जयघोष… चाहत्यांनी केले जोरदार स्वागत

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त जयस्वाल यांनी फेटाळले आरोप
नवी दिल्ली : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी संबंधित तपास कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याचा दावा काही माध्यमे व सोशल मीडियावरून पुढे येताच देशांतर्गत राजकारणातही वाद निर्माण झाला. मात्र भारत सरकारने हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शनिवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, तथाकथित एपस्टीन फाइल्समधील एका ई-मेलचा संदर्भ देत जे आरोप केले जात आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. संबंधित ई-मेलमध्ये पंतप्रधानांच्या 2017 मधील इस्रायल दौर्‍याचा उल्लेख आढळतो, ही बाब खरी असली तरी त्यापलीकडील सर्व कथन हे एका दोषी गुन्हेगाराच्या कल्पनारम्य व निराधार चिंतनातून निर्माण झालेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जायसवाल यांनी ठामपणे नमूद केले की, अशा प्रकारच्या आधारहीन आणि सनसनाटी दाव्यांना गांभीर्याने घेण्याचे कोणतेही कारण नाही. सरकार या आरोपांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असून, त्यांचा ठोस शब्दांत इन्कार करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेड़ा यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. खेड़ा यांनी एपस्टीनसारख्या दोषी व्यक्तीने पंतप्रधानांबाबत ई-मेलमध्ये उल्लेख करणे हे राष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते आणि सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली होती. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेच्या न्याय विभागाकडून सध्या एपस्टीनशी संबंधित तपास फाइल्स टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जात आहेत. या फाइल्समध्ये 2017 साली कतारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याला एपस्टीनने पाठवलेला एक ई-मेलही समाविष्ट आहे. एकूण सुमारे 35 लाख पाने आणि 2 हजारांहून अधिक व्हिडिओंचा हा तपास साहित्याचा संच आहे. अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्याअंतर्गत हे दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले आहेत. जेफरी एपस्टीनचा 2019 मध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता. त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा आणि दोषसिद्धीचा विचार करता, त्याच्या कथनांवर आधारित आरोपांना कोणतेही अधिकृत किंवा तथ्याधारित महत्त्व नाही, अशी भूमिका भारत सरकारने स्पष्टपणे मांडली आहे.

COMMENTS