Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज उपक्रमाचा शुभारंभ 

नाशिक :   पंतप्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज या उपक्रमात’ महाराष्ट्राचे मा.राज्यपाल तसेच कुलपत

देवेंद्र फडणवीसांना बुस्टर डोस घेण्याची गरज : बाळासाहेब थोरात
उदगीर भाजपच माजी सभापती शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये
ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा ‘सुपर शॉपींग मॉल’

नाशिक :   पंतप्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज या उपक्रमात’ महाराष्ट्राचे मा.राज्यपाल तसेच कुलपती  मा. श्री रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला   संबोधित केले.

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षक, विद्यापीठे व शिक्षण संस्थांवर आहे त्यांनी अमृत काळातील एकही क्षण वाया जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. अधिकाधिक युवकांना विकसित भारत संकल्पनेशी जोडण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या स्तरावर अभियान चालवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. विकसित भारत अभियानातून देशाला नेतृत्व प्रदान करणारी अमृत पिढी घडवायची आहे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी राजभवन येथील कार्यशाळेसाठी आलेल्या राज्यातील 65 विद्यापीठे व शिक्षण संस्थांच्या कुलगुरु व विद्यापीठ प्रमुखांच्या कार्यशाळेला संबोधित करताना मा.राज्यपाल श्री रमेश बैस यांनी ‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठे विकसित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 

विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांचा देशाच्या विकासाशी घनिष्ट संबंध आहे, असे नमूद करून बहुतेक विकसित राष्ट्रांकडील विद्यापीठे व संशोधन संस्था जगात अग्रेसर  आहेत, असे राज्यपालांनी सांगितले. महान राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये तेथील विद्यापीठांचा मोलाचा वाटा आहे असे सांगून विकसित भारतासाठी विकसित विद्यापीठे व विकसित शिक्षण प्रणाली असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.   

यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत ‘सक्षम भारतीय’, ‘समृद्ध आणि शाश्वत अर्थव्यवस्था’, ‘नवसंकल्पना, विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ‘सुशासन आणि सुरक्षा’, ‘जगामधील देशात भारत’, ‘विकसित भारत निर्मितीसाठी कृषी व पशुसंवर्धनाची भूमिका’ व ‘विकसित भारत’ उद्दिष्टप्राप्तीमध्ये युवकांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रांमध्ये विविध विद्यापीठांच्या प्रमुखांनी व कुलगुरूंनी आपापले विचार मांडले. यांसह राज्यातील 40 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

या कार्यशाळेत आपले विचार व्यक्त करतांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी विकसित भारत अभियानाअंतर्गत मुक्त विद्यापीठाच्या 5 लाख विद्यार्थ्यांच्या मनात 2047 मधील त्यांच्या मनातील, स्वप्नातील भारत कसा असेल, त्यांच्याकडील कल्पना जाणून घेण्यासाठी एक पोर्टल तयार करणार असून, त्यात विद्यार्थ्यांना आपले विचार, कल्पना  मांडता येतील.  त्याचबरोबर या अभियानाबाबतचे छोटे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठविण्यात येतील, तसेच विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या जातील असेही कुलगरूंनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून आलेली संपुर्ण माहिती एकत्रित केल्यानंतर त्याचे विश्लेषण करून मुक्त विद्यापीठ सदर अहवाल राजभवनच्या माध्यमातून निती आयोगाला पाठविण्यात येईल.

या कार्यशाळेस मुक्त विद्यापीठामार्फत कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या समवेत प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. जयदिप निकम, कुलसचिव श्री. भटूप्रसाद पाटील, संचालक डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. सुरेंद्र पाटोळे, डॉ. संजीवनी महाले, प्रा. माधव पळशीकर, प्रा. नागार्जुन वाडेकर, डॉ. नितीन ठोके, डॉ. वामन नाखले, डॉ. व्ही. बी. गायकवाड, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे उपस्थित होते.

COMMENTS