Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्र रक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांचा अभिमान : दिनकर पाटील

वीरमरण आलेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांचा सन्‍मान

नाशिक- नागरिक सुखासुखी जीवन जगतांना, समाधानाची झोप घेत असतांना सीमेवर आपले लष्करी जवान देशांचे रक्षण करत असतात. आपल्‍या जीवाची काळजी न करता जवान

वेटलिफ्टिंगमध्ये ’आकाश’ची वजनदार कामगिरी
बँकेच्या अधिकार्‍याकडून दरोड्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर डल्ला
संसदेतील कार्यालय शिवसेनेने घेतले ताब्यात

नाशिक- नागरिक सुखासुखी जीवन जगतांना, समाधानाची झोप घेत असतांना सीमेवर आपले लष्करी जवान देशांचे रक्षण करत असतात. आपल्‍या जीवाची काळजी न करता जवान देशसेवेसाठी सदैव तत्‍पर असतात. राष्ट्र रक्षणाचे कार्य करणाऱ्या या जवानांचा व त्‍यांच्‍या कुटुंबीयांचा समाजातील प्रत्‍येक घटकाने अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी केले.

शालिमार येथील आयएमए सभागृह येथे स्‍व.चतुर्भुज बजरंगलाल चौधरी प्रतिष्ठान, लोकज्‍योती ज्‍येष्ठ नागरिक मंच आणि लोकज्‍योती महिला मंडळ यांच्‍यावतीने आयोजित देशासाठी वीरमरण आलेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांचा सन्‍मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार वसंत गिते, वंधत्‍व निवारण तज्ज्ञ व स्‍त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ.उमेश मराठे , रामगोपाल चौधरी, तुप्तीदा काटकर, रंजनभाई शाह, रमेश डहाळे, पद्मिनी काळे, देवराम सैदाणे, योगेश कासार यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. दिनकर अण्णा पाटील म्‍हणाले, शहीद जवानांच्‍या कुटुंबीयांचा सन्‍मान करतांना त्‍यांच्‍या त्‍यागाचा सन्‍मान केला जातो आहे. जवानांप्रमाणे त्‍यांच्‍या कुटुंबियांचेही बलिदान मोठे असून भारतीयांनी याची जाणीव ठेवली पाहिजे.

माजी आमदार वसंत गिते म्‍हणाले, आजच्‍या कार्यक्रमानिमित्त शहीद जवानांच्‍या कुटुंबीयांना सन्‍मानित करण्याची, त्‍यांच्‍यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. या सदस्‍यांना आपण आपल्‍या कुटुंबातील सदस्‍य समजत यथोचित सन्‍मानाने वागविणे आवश्‍यक आहे. प्रजासत्ताक दिनाच्‍या पार्श्वभुमीवर या कार्यक्रमाला आणखीच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

डॉ.उमेश मराठे म्‍हणाले, देशाच्‍या विकासात प्रत्‍येक भारतीय आपल्‍या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्‍न करत असतो. परंतु देशाचे जवानांचे त्‍याग, परीश्रमाची तुलना होऊ शकत नाही. आपल्‍या देशाचा झेंडा कायम उंचावत राहावा, यासाठी जवान अहोरात्र देशसेवेत तैणात राहातात. म्‍हणूनच प्रत्‍येक भारतीयामध्ये जवानांविषयी आदराची भावना असते.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात कार्यक्रम आयोजनाचा उद्देश जितेंद्र येवले यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी, साहित्‍यिक रवींद्र मालुंजकर यांनी केले. स्‍वागत व आभार प्रदर्शन तृप्तीदा काटकर यांनी केले. यावेळी देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. मंजुषा खत्री, तृप्तीदा काटकर यांच्‍या जयोस्‍तुते ग्रुपने सुंदर सादरीकरण केले. यावेळी डॉ.राजेंद्र खैरनार, श्री.कुलकर्णी, श्री.दीक्षित, प्रिती दीक्षित यांचीही साथ लाभली. कार्यक्रमासाठी चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि., लायन्स क्लब ऑफ पंचवटी, श्री प्रेरणा एज्युकेशन यांचे सहकार्य लाभले.

यांच्‍या कुटुंबीयांचा झाला सन्‍मान  – शहीद ब्रिजेश कुमार मिश्रा, कोंडाजी दराडे, शशिकांत बच्‍छाव, सुरेश सोनवणे, सुनिल मोरे, यशवंत ढाकणे, प्रसाद क्षीरसागर, श्रीकांत बोडके, एकनाथ खैरनार, राकेश आणेराव, रविंद्र सोनवणे, दीपक चौधरी, वसंत लहाने, सुधाकर खेडकर, केशव गोसावी या शहीद जवानांच्‍या कुटुंबीयांचा सत्‍कार करण्यात आला.

COMMENTS